श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या वतीने सचिन बेंडभर सन्मानित
चौथीच्या पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल
शिरूर:- प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या 'बचत' या कथेची चौथीच्या पाठ्यपुस्तकात निवड झाल्याबद्दल श्रीनाथ सोशल फाउंडेशन नवलेवाडी यांच्या वतीने पुणे येथील सहाय्यक वनरक्षक रामदास पुजारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धक रमेश खरमाळे,डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, कृषी सहाय्यक राजश्री नरवडे, बिनाई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन शेलार,वनपरीक्षेत्र अधिकारी चेतन कांबळे,प्रदिप चव्हाण,सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर डुंबरे, वृक्षमित्र प्रमोद ढगे,लोककला महोत्सवाचे प्रणेते वसंत जगताप,उद्योजक विमलेश गांधी,समीक्षक विजय लोंढे,अध्यक्ष संजय पठाडे आणि ईश्वर जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरातील माळरानावर साहित्यिकांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चौथीच्या पाठ्यपुस्तकात बचत या कथेची निवड झाल्याबद्दल लेखक सचिन बेंडभर यांचा श्रीनाथ सोशल फाउंडेशन नवलेवाडी यांच्या वतीने पुणे येथील सहाय्यक वनरक्षक रामदास पुजारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या कवी संमेलनात तब्बल ३१ कवींनी सहभाग घेतला. यावेळी पर्यावरण जागृती व पर्यावरणाचे रक्षण यासंदर्भात कविता सादर करत विकासाच्या नावावर होत चाललेली वृक्षतोड यावर कवींनी आपल्या कवितांमधून लक्ष वेधले. यात संदिप वाघोले,यशवंत घोडे,बाबाजी शिंदे,मधुकर गिलबिले,रोहिणी अहेर,श्रद्धा अहिनवे,साहेबराव घुले,नवनाथ सरोदे,रणजीत पवार,ज्योती शेलार,पवन कदम,दिलीप कदम,सचिन कदम आणि नानाभाऊ नवले आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संदीप वाघोले,स्वागत विजय लोंढे यांनी केले. पवन कदम यांनी आभार मानले.