देवगड येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
तीनशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
आंबा व फळ पिकांसाठी शासन दरबारी मागण्यांचे निवेदन सादर
देवगड :-देवगड तालुक्यातील आंबा व इतर फळ बागायतदार शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या संकटाचा विचार करून शासन दरबारी आपले विविध मागण्यांसाठी आंबा व इतर फळ बागायतदार शेतकरी संघ, देवगड" या संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा देवगड सातपायरी येथील नेने गणपती मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला.तहसीलदारांची सविस्तर चर्चा करून"आंबा व इतर फळ बागायतदार शेतकरी संघ, देवगड" या संस्थेच्यावतीने विविध मागण्यांबाबतचे देवगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आंबा व इतर फळ बागायतदार शेतकरी संघ, देवगड" या संस्थेच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात खालीलप्रमाणे मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
हवामानावर आधारित पीक विमा योजना फळ पिकांसाठी स्वतंत्र विभागाद्वारे अमलात आणावी.
फळपिक विम्याचा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत निश्चित करण्यात यावा.
पोषणतत्वांची चाचणी करून संपूर्ण क्षेत्राचा विमा कवचात घ्यावा.
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार १००% विमा संरक्षण द्यावे.
हवामानाचा प्रभाव दर्शवणारा तालुकास्तरीय हवामान डेटा वेळीच सादर करावा.
दुसरी विमा कंपनी पर्यायी म्हणून शेतकऱ्यांना निवडण्याची मुभा द्यावी.
विमा नुकसान भरपाई वेळेवर व संपूर्ण मिळावी.
मागील विमा परतावा मिळालेल्यांना नवीन योजना लागू न करणे.
ऑल इंडिया सायंटिफिक तपासणी केंद्र देवगडमध्ये स्थापन करून माती, पाणी तपासणीची सोय करावी.
पोषणतत्व चाचणीसाठी नवीन प्रयोगशाळा सुरु करावी.
पहाटेच्या गारठ्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी.
कोकण आंबा बोर्ड पुनः स्थापन करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा.
मुंबई मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी स्वतंत्र शेड उपलब्ध करून द्यावा.
हवामान शास्त्रज्ञांचा सल्ला घेत तीन महिन्यांचा हवामान अंदाज प्रसिद्ध करावा.
२२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष सल्लागार समिती गठीत करावी.या प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास रूमडे,उपाध्यक्ष रामदास अनभवणे,सचिव संकेत लब्दे,खजिनदार शुभम चौगुले,सहसचिव चंद्रकांत गोईम,सदस्य समशेर खान,श्रीकृष्ण साटम,सत्यवान गावकर,इंद्रनील कर्वे,कुंदन घाडी,निलेश पेडणेकर,नाना गोडे,रंजना कदम,विमल बलवान, श्यामल जोशी,राजीव वाळके,अरविंद वाळके,मुल्ला गुरुनाथ कांबळी,जयवंत लाड,भाई कदम,विकास दीक्षित,राजन किंजवडेकर आदीसह सुमारे ३०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते .