शिरूर कचरा डेपोला आग
शिरूर :- शिरूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोला आग लागण्याची घटना घडली आहे.
कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रचंड धूर आणि दुर्गंधी पसरली आहे.
या आगीमुळे शिरूर शहरात प्रदुषण वाढून नागरिकांना श्वसनाचे विकार,डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या समस्या बळावण्याची शक्यता येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )