माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे :- पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
क्रीडा विश्वात त्यांचे नाव मोठे होते. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणा-या कलमाडींनी राजकारणात मोठे स्थान मिळविले. पुण्याचे खासदार,केंद्रीय मंत्री,भारतीय आॅलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.पुणे फेस्टिवल,पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले. कलमाडी यांच्यामुळे पुण्याला क्रीडा नगरी म्हणून ओळख मिळाली. पुण्यातील म्हाळूंगे बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.