टिटवाळ्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न
गोरगरीब महिलांना साडी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळ्यातील सुप्रसिद्ध टिटवाळा न्यूज ग्रुप व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व महिलांसाठी साडीचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी,इसीजी,बीपी,शुगर,अस्थिरोग तपासणी,नेत्र तपासणी,नाडी परीक्षण,दंत तपासणी,फिजिओथेरपी,रक्त तपासणी,कॅन्सर तपासणी,जनरल तपासणी,लहान मुलांची तपासणी,महिला तपासणी तसेच अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा लाभ तब्बल 450 महिला,पुरुष,जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलानी लाभ घेतला .
या शिबिरास मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3,निरामय हॉस्पिटल,क्लिनिटेक लॅबोरेटरी लिमिटेड,नेत्राक्ष डोळ्याचे हॉस्पिटल,स्माईल सिटी मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल,रि लाईव्ह फिजीओथेरेपी व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचे विशेष सहकार्य लाभले
कार्यक्रमाची सुरुवात कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. तसेच आरपीआयचे शहर अध्यक्ष विजय भोईर व सुरेश कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील,वरिष्ठ लिपिक नंदकुमार वाणी,आरपीआयचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव;आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर युवक सन्नी जाधव,उपाध्यक्ष सन्नी गायकवाड,ऍडव्होकेट जितेंद्र जोशी,विलास भारती,गजानन खिसमतराव,प्रभाकर भोईर,रवींद्र गायकवाड,प्रमोद जगताप,दिलीप भोईर,गणेश भाटे इत्यादीजन प्रमुख उपस्थित होते.सहशिक्षिका संगिता रविंद्र गायकवाड यांनी पहिल्या महिला रक्तदात्या म्हणून सहभाग नोंदवला.
टिटवाळा न्यूज ग्रुप मित्र परिवारातील किशोरभाई शुक्ला,योगेश देशमुख,सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील,माजी नगरसेवक मयूर पाटील,अभिजित भांडे पाटील,प्रांताधिकारी विश्वास गुजर,पोलीस निरीक्षक सुरेश कदम,रोहित खिसमतराव,संदीप गायकवाड,सतीश भाटीया,राज चौधरी,जयसिंग,सतीश तिवारी,तुकाराम घोडविंदे,भरत मढवी,धनंजय पाटील,चंद्रकांत धपाटे,हरिश्चंद्र हरणे,अरविंद शेलार,बंदेश जाधव,परेश गुजरे,दीपक साळवी,अक्षय कराळे,डॉ.संजय पाटील,गणेश कोंडे,महेश भोय, सुभाष पंडीत,सुनील जावडेकर,आसिफ पावले,महेंद्र हाडवळे,शगफ रईस,इस्माईल पठाण,ऍड.जितेंद्र जोशी,मंगेश गुजरे,सन्नी जाधव,दीपक कांबळे,हरिश्चंद्र हरणे,महेश एगडे,सुरेश आडे,रत्नाकर पाटील,ऍड.सागर वाकळे,अरुण भोय,चिंतामण पवार,विलास भारती,गजानन खिसमतराव,जयराम चौधरी इत्यादींनी विशेष सहकार्य केले.
तर शिबीर यशस्वी करण्यास पत्रकार राजू टपाल,टिटवाळा न्युज ग्रुप परिवार,प्रमोद नांदगावकर,रेड स्वस्तिक सोसायटी व त्यांच्या संपूर्ण टीम,प्रभाकर भोईर,बळीराम शेलार,महेंद्र शेजूळ,नंदलाल पगारे,जयश्री टपाल,श्रद्धा टपाल,श्रुती टपाल,क्षितिज टपाल,तनुजा भोईर,जागृती भोय,प्रदीप महाडिक,यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वैद्य यांनी केले.