डोंबिवली-जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून डोंबिवली येथील गार्गी वृध्दाश्रमास जनजागृती सेवा समितीच्या वतीने जनजागृतीच्या सह खजिनदार सौ.श्रुती उरणकर व जनजागृतीच्या कार्यकर्त्या सौ.संजीवनी चव्हाण, सौ. सविता ठाकुर यांनी आश्रमास भेट देऊन किराणा, मास्क व खाऊ वाटप केले. तसेच श्रुती उरणकर यांचे वडील कै.चंद्रमोहन मानकर व काका कै.विजय मानकर व सासरे कै.शांताराम उरणकर यांच्या स्मरणार्थ येथील पुरुष व महिला वृध्दांना अन्नदान करण्यात आले. तसेच संजीवनी चव्हाण यांच्या वतीने साखर व बिस्किटे देण्यात आली. तसेच याप्रसंगी १आक्टोबर या राष्ट्रीय रक्तदान दिनाचे औचित्य साधून सौ.संजीवनी चव्हाण यांनी रक्तदानही केले.जनजागृतीच्या वतीने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल श्रुती उरणकर, संजीवनी चव्हाण, सविता ठाकुर यांना जनजागृती सेवा समितीचे आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला. राजू मानकर याचे अन्नदानासाठी विशेष सहकार्य लाभले.