गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या कल्याण तालुक्यातील चार हजार बांधकाम धारकांना सुप्रीम कोर्टाच्या नोटीस,आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवेली येथे बैठक संपन्न.
गायरान जमिनीवर अतिक्रमणे करणाऱ्या कल्याण तालुक्यातील जवळपास चार हजार बांधकाम धारकांना सुप्रीम कोटौच्या वतीने नोटीस बजावली आहे, सदर बांधकाम निष्काशित करण्यात यावे असे या नोटिशी मध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत, आज आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थित मध्ये बैठक घेण्यात आली या बैठकी मध्ये एकही नागरिकाला बेघर केले जाणार नाही यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत असे आमदार कथोरे यांनी सांगितले.
जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य व इतर याचीकेवर सुप्रीम कोटौत याचिका सिव्हिल अपिल क्र 1132/2011@ एस,एल,पी,/सी 3109/2011याचिका दाखल केली होती, गायरान जमिनीवर अतिक्रमणे केलेल्या बाबत, संपूर्ण देशात दहा लाख हेक्टरी गायरान जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम झालेली आहेत ,असे
सुप्रीम कोटौच्या निदर्शनास आले, ते बांधकाम हाटवावे असा सुचना राज्यातील सचिवांना दिले, त्या प्रमाणे राज्यातील सचिवांनी प्रत्येक जिल्हा अधिकारी यांना आदेश दिले त्या प्रमाणे ठाणे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तहसीलदार कायौलय तहसीलदार जयराज देशमुख यांनी कल्याण तालुक्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमणे करणाऱ्या बांधकाम धारकांना मागील आठवड्यात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत व सदर बांधकाम सात दिवसाच्या आत मध्ये हाटवावे असे आदेश नोटीस मध्ये दिल्याने नागरिक भयभीत झाले आहेत,
याबाबत आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवेली येथे बैठक घेण्यात आली, बैठकीला भाजपचे कल्याण तालुका अध्यक्ष चंदु बोस्टे,बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे,योगेश धुमाळ, प्रकाश भोईर, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समिती सभापती रेशमा मगर, उद्योजक अनिलशेठ दळवी, जयेश शेलार, यांच्या सह सरपंच, उपसरपंच, सदस्य, व नोटीस धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवर अतिक्रमणे करणाऱ्या बांधकाम धारकांना नोटीसा दिलेल्या आहेत,परंतु आपण घाबरून जावू नये, आपल्या कडे असणारे कागदपत्रे पुरावे याची फाईल बनवून ठेवणे,मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याची 22 नोव्हेंबर रोजी मंत्रालय मध्ये भेट घेणार आहे, तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी हि मांडणार आहे, एकही नागरिकाचे घर तोडू देणार नाही,
परंतु आपण गाफील राहू नये, प्रत्येक ग्रामपंचायत ने विस्तार ठराव घेऊन शासनाकडे पाठवला पाहिजे, तसेच यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता सरपंच यांनी घेतली पाहिजे,
नडगाव दानबाव/खडवली बेहरे/राया /आदी ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमणे वाढत असून बाहेरचे नागरिक मोठ्या प्रमाणावर येत आहेत, त्या मुळे गावाचे गावपण जाईल व बकालपणा येईल याला जबाबदार तेथील ग्रामपंचायत असेल असे सांगितले,
अँड गायकर यांनी सांगितले की आम्ही तीस वषै पासून राहत आहे असे आसतांना आम्हाला हि नोटीस बजावली आहे, नोटीस बजावतांना मुदत देवुन आमची बाजु मांडण्याची संधी देण्यात यावी असे सांगितले,