दुर्गादेवी पावली
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला हिंदवी स्वराज्याचे आरमार स्थापन केले आणि जगावर राज्य केले म्हणून महाराजांना "Father of Indian Navy" असे संबोधले जाते.
आज दुर्गाडी किल्ल्याच्या निकाल लागला कोर्टाने ती वास्तू मंदिर आहे जे जाहीर केले आहे. सर्व दुर्गप्रेमी - शिवप्रेमी - गिर्यारोहक - शिवभक्तांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास -
दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा शिर्केसातवाहन राजे. राजांनी हजारो लाखो वर्षांपूर्वी केलेली आहे.
दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर हे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र आणि शक्तीपीठ आहे. शिवभगवान सातवाहन साम्राज्य संरक्षित स्मारक आहे.
दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर परिसरा मधून शिर्केसातवाहन काळापासून सातवाहन साम्राज्य महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारत (हिंदुस्थान) देशाचा व्यापार देश - विदेशामध्ये चालत होता आणि तो आजही चालत आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीचे मंदिर हे जागृत देवतेचे मंदिर आहे. याठिकाणी शिर्केसातवाहन काळामध्ये प्रत्यक्षात दुर्गादेवी प्रकट झाली होती. तेव्हापासून याठिकाणी हे मंदिर आहे.
परदेशातून म्हणजेच दुसऱ्या राज्यातून देशातून कल्याण बंदरामध्ये येणार व्यापारी माल कल्याण बंदरा मधून नाणेघाट मार्गे जुन्नर - अश्यमकनगर (अहमदनगर) मार्गे पैठण ला जात असे.
दुसरा मार्ग कल्याण बंदरापासून माळशेज घाट मार्गे जुन्नर जुन्नर - अश्यमकनगर (अहमदनगर) मार्गे पैठण - बीड आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये जात असे.
तिसरा मार्ग कल्याण बंदरापासून माळशेज घाट मार्गे जुन्नर - नाशिक.
अशाप्रकारचे अनेक महामार्ग होते ज्या मार्गांवरून संपूर्ण राज्यामध्ये व्यापारी मला पोहचविला जात असे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल याच कल्याण बंदरातून देश - विदेशा मध्ये निर्यात केला जात असे.
कल्याण बंदर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे.
शिर्केसातवाहन राजांनी कल्याण बंदर आणि दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मराठा सातवाहन साम्राज्याचे पहिले आरमार, नौसेना, समुद्री सेना, बंदर स्थापन केले.
त्याचबरोबर कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला दुरुस्ती करण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ला दुरुस्ती पाया खोदतांना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीचीच कृपादृष्टी आहे.
दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करीता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.