स्व .प्रकाश पेणकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय योजना शिबीर
कल्याण/कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तसेच माजी सभागृह नेते प्रकाश पेणकर यांच्या जयंती निमित्त परिसरातील नागरिकांन साठी शासकीय योजना शिबीराचे आयोजन युवासेनेचे सह सचिव महाराष्ट्र प्रतिक पेणकर यांनी बैलबाजार येथील जनसंपर्क कार्यालय करण्यात आले होते,
स्व,प्रकाश पेणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्या नंतर शिबीराला सुरुवात करण्यात आली,
शासकीय योजना शिबीरा मध्ये आभा कार्ड, ई श्रम कार्ड,नवीन पँनकार्ड, आयुष्यामान भारत कार्ड, मतदान काडै,दिव्यांग कार्ड, ईत्यादी योजनेचे शिबीर आयोजित केले होते, परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला,
यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर,रिक्षा चालक मालक असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष नवले,उपाध्यक्ष जितेंद्र पवार, शगीरभाई शेख,सेक्रेटरी विलास वैध,तसेच सुभाष पेणकर, हेमंत सांगळे,यांच्या सह आदि उपस्थित होते,