ग्रामपंचायतमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर
Raju Tapal
November 19, 2021
49
राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
निधन, राजीनामा ,अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणुक होत आहे.
ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे स्विकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ९ डिसेंबर २०२१ पर्यंत मागे घेता येतील . त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत होईल .गोंदिया,गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी साडेसात पासून दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
पुणे जिल्ह्यात ५०३ जागांसाठी पोटनिवडणुक होत असून वेल्हे तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमधील ६५ जागांसाठी, भोर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींमधील १२१ जागांसाठी, पुरंदर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमधील २७ जागांसाठी, दौंड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधील ६ जागांसाठी, बारामती तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील १३ जागांसाठी, इंदापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमधील ८ जागांसाठी, जुन्नर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींमधील ५५ जागांसाठी, आंबेगाव तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमधील ५५ जागांसाठी, खेड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींमधील ४९ जागांसाठी, शिरूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींमधील १२ जागांसाठी, मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील १९ जागांसाठी, मुळशी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमधील ६३ जागांसाठी,हवेली तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमधील १० जागांसाठी ही पोटनिवडणुक होत आहे.
Share This