• Total Visitor ( 84365 )

शनिवारला मतदान जनजागृती साठी भव्य सायकल रॅली

Raju tapal November 12, 2024 21

शनिवारला मतदान जनजागृती साठी भव्य सायकल रॅली

जिल्हा स्वीप कक्षाचा उपक्रम

अमरावती दि.१२-विधानसभा सार्वञिक निवडणूक-२०२४ करीता मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन जिल्हा स्वीप कक्षा व्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणुन येत्या शनिवार १६नोव्हेंबरला भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
   जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अमरावती,जिल्हा परिषद अमरावती,अमरावती सारकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०कीलो मिटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या सायकल रॅलीत प्रवेश निशुल्क असुन सहभागी होण्याकरीता QRकोड स्काॅन करुन कींवा लिंक भरून १४नोव्हेंबर पर्यंत सहभागी होता येणार आहे.
   या सायकल रॅलीची सुरुवात १६नोव्हेंबरला सकाळी ६.३०वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथुन सुरुवात होणार असुन ही सायकल रॅली कलेक्टर आॅफीस,बियाणी,कमिश्नर आॅफीस,कांता नगर,पंचवटी,शेगाव नाका,काॅटन मार्केट रोड,चौधरी चौक,जयस्तंभ चौक,रेल्वेपुलावरुन काँग्रेस नगर रोड हमालपूरा,रुख्मिणी नगर,गल्स हायस्कृल,शिवाजी नगर (राठी शाळा),जिल्हा स्टेडियम येथे समारोप होणार आहे.आरोग्यासाठी सायकल,मतदान करेल भविष्य उज्वल हा संदेश देत.होय मी मतदान करणार हा संदेश सहभागी होणारे देणार आहे.
   या सायकल रॅली मध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावतीचे सोरभ कटीयार,पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ,पोलीस अधिक्षक विशाल आनंद,मनपा आयुक्त सचिन कलंञे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदेसह विविध खाते प्रमुख अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहे.या सायकल रॅलीत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,राजेश सावरकर,श्रीकांत मेश्राम,नितिन माहोरे,हेमंतकुमार यावले,विशाल विघे,गजानन कोरडे,अतुल देशमुख,आदित्य तायडे सह अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.चंद्रशेखर कुलकर्णी आणि पदाधिकारी यांनी केले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement