गुरू हैबतबाबांच्या पायरीपुजनाने माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यास ,कार्तिकी यात्रेस सुरूवात
टाळ मृदंगाच्या निनादात ,पुजा-यांच्या मंत्रोच्चारात शनिवारी दि.२७ नोव्हेबरला सकाळी ९ वाजता मंदीराच्या मुख्य महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपुजनाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यास कार्तिकी यात्रेस श्री.क्षेत्र आळंदी येथे भक्तिमय वातावरणात सुरूवात करण्यात आली.
माऊलींचे पुजारी श्रीनिवास कुलकर्णी ,अमोल गांधी, श्रीरंग तुर्की यांनी विधिवत पौराहित्य केले.
गुरू हैबतबाबांच्या पायरीला दुध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण, हारतुरे, पेढे अर्पण करत पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार व कुटूंबियांच्या हस्ते पायरीचे पुजन करण्यात आले,
महाद्वारातील विधिवत पुजेनंतर माऊलींची आरती आणि पसायदान घेण्यात आले.
त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून माऊली मंदिरातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती घेण्यात आली.
याप्रसंगी मुख्य विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ऍड विकास ढगे पाटील, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर, माजी नगराध्यक्ष राहूल चिताळकर, सचिव अजित वडगावकर माजी नगरसेवक डी.डी.भोसले, अध्यक्ष माऊली गुळूंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हैबतबाबांच्या वंशजांच्या वतीने विश्वस्त मंडळ आणि माऊलींच्या मानक-यांना नारळप्रसाद देण्यात आला.
आळंदी शहरात भाविकांची गर्दी वाढत असून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायंकाळी पंढरीहून पायी चालत आलेल्या संतांच्या दिड्यांनी आळंदीत प्रवेश केला.