टिटवाळ्यात हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
टिटवाळा :- सालाबादप्रमाणे या वर्षी ही ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तर्फे मोठ्या जल्लोषात हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा आणि गावसई यात्रा संपन्न हजारो भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी
हनुमान जन्मोत्सावनिमित्त टिटवाळा येथील सुमारे 100 ते 150 वर्ष पुरातन असलेल्या हनुमान मंदिरात 11 एप्रिल रोजी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, रात्रीचा जागर भजन तर 12 एप्रिल ला पहाटे 5 वाजता हनुमान जन्मोत्सव तसेच मूर्ती अभिषेक दुपारी खिचडी तसेच फळ आणि ताक वाटपाचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ टिटवाळा तर्फे आयोजित केला होता संद्याकाळी 5 वाजता मोठया थाटात पालखी सोहळा पार पडला जय मल्हार ब्रास बँड पथक टिटवाळा यांनी पालखी सोहळ्यात बँड वाजवून माता भागीनींनी आणि ग्रामस्थाना बँड च्या तालावर नृत्याचा आनंद घेतला.