हर्षवर्धन पाटलांचे इंदापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
Raju Tapal
November 29, 2021
43
हर्षवर्धन पाटलांचे इंदापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
इंदापूर तालुक्यातील शेतक-यांचा वीजपुरवठा गेल्या ११ दिवसांपासून महावितरणने पूर्णपणे खंडीत केला आहे. शेतीचा वीजपुरवठा सुरू केला जात नसल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शनिवार दि.२७ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
शैतक-यांच्या शेतीचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत केल्याने शैतीचे मोठे नुकसान होत असून जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
महावितरण कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांनी रात्रभर मुक्काम केला. दुस-या दिवशी रविवारीही बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते.
शैतक-यांचा वीजपुरवठा सुरू होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.
आंदोलनस्थळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
Share This