• Total Visitor ( 449603 )
News photo

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Raju tapal June 12, 2025 63

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज;

मान्सून पुन्हा सक्रीय होणार 



मुंबई :- मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रीय होणार आहे. येत्या 5 दिवसांसाठी राज्यासाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.



हवामान खात्याच्या मते,12 जूनपासून 14 जूनपर्यंत कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात 12 जूनसाठी रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.



तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथ, सांगली, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यात या पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जून नंतर राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय होण्यास पूरक वातावरणनिर्मिती होणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी दिली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement