• Total Visitor ( 84470 )

नगरपरिषद,पंचायत समिती क्षेत्रातील मतदारांसाठी हेल्पलाइन

Raju tapal November 18, 2024 90

नगरपरिषद,पंचायत समिती क्षेत्रातील मतदारांसाठी हेल्पलाइन_

मतदान केंद्रासह संबंधित माहिती जाणून घेण्याचे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ यांचा उपक्रम

अमरावती दि.१८- विधानसभा सार्वत्रिक
निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून स्वीप योजनेतंर्गत वेगवेगळे उपक्रम सुरु करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद,पंचायत समिती क्षेत्रातील मतदारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने कार्यालयीन वेळेत हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे.

 अमरावती जिल्हातील १४पंचायत समिती मधिल विधानसभा परिक्षेत्रातील सर्व मतदारांना कार्यालयीन वेळेत सकाळी१० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सदर दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क करता येणार आहे. जिल्हा परिषद अमरावती व स्वीप कक्षा मार्फत सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर मतदारांना मतदानाबाबत संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार मतदारांच्या मतदान केंद्राचे नाव व पत्ता, मतदान खोली क्रमांक, मतदार क्रमांक, मतदारांचा यादी भाग क्रमांक आदींबाबत मतदारांना माहिती जाणून घेता येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्हातील ८ विधानसभा परिक्षेत्रात मतदार चिठ्ठया (व्होटर इन्फॉर्मेशन स्लीप) बीएलओंमार्फत सर्व मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम युध्द्धस्तरावर सुरु आहे; परंतु ज्या मतदारांपर्यंत अद्याप मतदार चिठ्या पोहोचलेल्या नाही, त्या सर्व मतदारांनी नगरपरिषद व पंचायत समिती मार्फत सुरु करण्यात आलेल्या कर्मचारी यांच्या मोबाईल नंबरवर आणि अमरावती जिल्हा परिषदच्या स्वीप कक्षाच्या ०७२१-२६६६२६१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ यांनी केले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement