• Total Visitor ( 134258 )

हिंदी ‌पुरस्कार वितरण समारंभ पुण्यात संपन्न  

Raju tapal March 02, 2025 116

हिंदी ‌पुरस्कार वितरण समारंभ पुण्यात संपन्न  

शिरूर :- हिंदी दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा हिंदी अध्यापक सभेच्या वतीने  घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धा व हिंदी काव्यकंठस्थ  स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रावसाहेब पटवर्धन विद्यालय , ज्युनिअर कॉलेज,बॅरिस्टर नाथ पै सभागृह ,पर्वती पायथा, दांडेकर पूल, सिंहगड रोड,पुणे -३० याठिकाणी संपन्न झाला .
जिल्ह्यातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले सभेच्या वतीने सभेचे संस्थापक स्वर्गीय पी.ई. कुलकर्णी सर यांच्या नावे सुरू करण्यात आलेला हिंदी गुणी अध्यापक पुरस्कार अनिता चौधरी यांना देण्यात आला तर हिंदी जीवनगौरव पुरस्कार वृंदा कुलकर्णी यांना देण्यात आला हे सर्व पुरस्कार महाराष्ट्र राज्य सभेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर नीला बोरवणकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य वृंदा हजारे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर नीला बोरवणकर यांनी हिंदी अध्यापक सभेचे हिंदी प्रचार आणि प्रसाराची चाललेले कार्य कौतुकास्पद आहे असे उद् गार  काढले. तर विश्वस्त विठ्ठल शिंदे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले सभेचे अध्यक्ष संजीव मांढरे यांनी हिंदी प्रचार आणि प्रसाराचे काम सभेच्या वतीने असेच चालू राहील असे सांगितले. या कार्यक्रमाचे  व स्पर्धेचे नियोजन सभेचे उपाध्यक्ष भाग्यश्री सुपेकर, दिलीप काळे, विश्वस्त विठ्ठल शिंदे ,प्रसिद्धी प्रमुख महालिंग कुलाळ , भोसले सर यांनी केले 
सभेचे अध्यक्ष संजीव मांढरे ,सचिव दिलीप काळे, कार्याध्यक्ष उस्मान मुलांनी ,उपाध्यक्ष रमेश बोरावके ,विश्वस्त विठ्ठल शिंदे,  नंदकुमार चावरे सर , गोसावी मॅडम , गजानन गोसावी, सभेचे पदाधिकारी अशोक  ठाणगे, रेश्मा गायकवाड ,अश्विनी चेन्नूर, दिपाली चिकणे, दिपाली व्यवहारे , भोसले सर ,महालिंग कुलाळ,
राजवाडे मॅडम ,मुजावर सर यावेळी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन रेश्मा गायकवाड ,दिपाली व्यवहारे यांनी केले .
अध्यक्ष  संजीव मांढरे यांनी आभार मानले. 

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )
 

Share This

titwala-news

Advertisement