• Total Visitor ( 507428 )

पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश;ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त 

Raju Tapal publisher May 04, 2026 10

पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश;ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त 



नवी दिल्ली :-जवळपास संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना विरोधातील एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाजपला आजपर्यंत शरण न गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची दाट चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्षे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सरकार होते. देशातील अनेक राज्यं भाजपच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकवून ठेवला होता. मात्र,सोमवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता याठिकाणी भाजपची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार,भाजपने 157 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल अवघ्या 115 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता येणार आहे. हे भाजपसाठी ऐतिहासिक यश मानले जात आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement