होडीतून फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या तरूणासह मच्छिमाराचा उजनी धरणात बुडून मृत्यू
Raju Tapal
January 17, 2022
37
होडीतून फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या तरूणासह मच्छिमाराचा उजनी धरणात बुडून मृत्यू
उजनी धरणात फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या एका तरूणासह मच्छिमाराचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील चिखलठाणा परिसरात १४ जानेवारीला घडली.
समीर याकूब सय्यद , अल्ताफ एकबाल शेख अशी मयतांची नावे आहेत.
मयत समीर याकूब सय्यद हे करमाळा तालुक्यातील चिखलठाणा परिसरात वास्तव्यास होते.त्यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. सय्यद यांच्याकडे मुंबईहून चार पाहुणे आले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सय्यद यांच्यासह होडीतून फेरफटका मारण्यासाठी उजनी धरणाच्या पाण्यात गेले होते.पाण्यात फेरफटका मारत असताना अल्ताफ शेख या तरूणाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. अल्ताफला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी समीर सय्यद यांनी पाण्यात उडी मारली. मात्र अल्ताफने समीर यांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर
Share This