अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर "मी मतदान करणार"चे स्टीकर
Raju tapal
November 13, 2024
33
अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर "मी मतदान करणार"चे स्टीकर
जिल्हा स्वीप कक्षाची मतदार जनजागृती
अमरावती दि.१३-महाराष्ट्र विधानसभा सार्वञीक निवडणूक येत्या २०नोव्हेंबरला होत आहे.मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन विविध उपक्रम जिल्हा प्रशासन राबवित आहे.आता शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या शासकीय व वैयक्तीक वाहनावर मतदान जनजागृतीचे स्टीकर लावण्यात आले.विशेष म्हणजे अधिकारी यांनी स्वतः वाहनावर स्टीकर लावले हे विशेष.
SVEEP अमरावती
जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती संजीता महापाञ यांनी त्यांचे वाहनावर "मी मतदान करणार" हे स्टिकर लावून शुभारंभ केला.तसेच प्रकल्प अधिकारी प्रिती देशमुख, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस,विधी सल्लागार प्रणिता कढरे,उप अभियंता डाॅ.पुरुषोत्तम सोळंके,संजय राठी,संजय येवतीकर,निलेश तालन,श्रीकांत मेश्राम,वनिता घुबडे,अर्पणा आत्राम,निशांत तायडे,गजानन कोरडे,नंदकुमार गुडघे,गजानन जुनघरे,इमरान शेख,अविनाश गावंडे,पंकज धर्माळे,संजय धोटे,राजेश सावरकर,हेमंतकुमार यावले,नितिन माहोरे,अतुल देशमुख,आदित्य तायडेसह सर्व खाते प्रमुख जि.प.अमरावती यांनी त्यांचे वाहनावर "मी मतदान करणार" हे प्रसिध्दीचे स्टिकर लावून शुभारंभ केला.तसेच शहर व ग्रामिण भागातील शासकीय कार्यालय,सार्वजनिक ठीकाणी मतदान जनजागृतीचे स्टिकर लावण्यात आले.
Share This