टिटवाळ्यात भैरवनाथ हेल्थ अँड वेल्थ सेंटरचे उदघाटन
भैरवनाथ हेल्थ अँड वेलनेस सेंटर अर्थात मिशन फिट भारत निरोगी जगण्याचा महामंत्र जेथून मिळतो अशा या ऑफलाइन सेंटरची पहिल्यांदाच टिटवाळा मध्ये सुरुवात झाली.
सदर सेंटरच्या उदघाटनासाठी वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे (20k प्रेसिडेंट टीम ) त्यांच्यामार्फत ऑनलाईन दररोज 70 हजार व्यक्ती सकाळी वर्कआउट करतात यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्षाताई भोईर तसेच शक्तिवान भोईर तसेच मनसेचे नेते बंदेश जाधव, टिटवाळा येथील जागतिक आरोग्य सल्लागार किशन मुंडे,संतोष सांगळे,सुरज पाटील यांच्या सहकार्याने वेलनेस कोच शंकर खिची यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.