निंबवली ते ओझर्ली रस्त्याचे खासदार सुरेश(बाळ्यामामा)म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
किरण केणे यांच्या पाठपुराव्याला यश..!
टिटवाळा - कल्याण पंचायत समितीच्या राये गणातील निंबवली ते ओझर्ली या सुमारे ५०० ते १००० मीटर लांब असलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुरेश(बाळ्यामामा)म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच झाले, धर्मवीर चँरेटेबल ट्रस्ट चे कल्याण ग्रामीण चे अध्यक्ष किरन राम केणे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याने खासदारांनी व परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
टिटवाळा आणि खडवली या दोन स्टेशन पासून साधारणपणे ९ किमी अंतरावर निंबवली हे गाव वसलेले आहे. कल्याण पंचायत समितीच्या राये गणात आणि जिल्हा परिषदेच्या घोटसई गटातील या गावांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. अशातच या परिसरातील १० ते १५ गावातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातो, यामुळे या गावांचे अनेक रस्ते बंद झालेले आहेत, या रस्त्याच्या कामासाठी निंबवली राया ओझर्ली या अंतर्गत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे येथील धर्मवीर चँरेटेबल ट्रस्ट चे कल्याण ग्रामीण अध्यक्ष किरन राम केणे यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश(बाळ्यामामा)म्हात्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, अखेर खासदार म्हात्रे यांनी समृद्धी महामार्गाचे ईश्वर यांना सांगून निंबवली ते ओझर्ली रस्त्याच्या कामाला ताबडतोब सुरुवात केली. याचे उद्घाटन आज खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
ग्रामस्थांनी केलेल्या विविध कामांच्या मागणी बाबतीत आपण लक्ष घालू असे आश्वासन दिले तसेच १९८० पासून प्रंलबित असलेल्या गुरवली स्टेशन बाबतीत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे सांगितले. किरन केणे याच्या सारखा कार्यकर्ता असल्यावर कामे कसे होतात हे तुमच्या समोर आहे असे कौतुकास्पद उदगार त्यांनी काढले. यावेळी या परिसरातील कोंढेरी, सांगोडा,वासुर्दी, निंबवली,उतणे चिंचवली,मोस,नडगाव, दानबाव,बेलकरपाडा, गुरवली, राये,ओझर्ली, आदी विविध गावातील विकास कामाचे निवेदन याप्रसंगी खासदार बाळ्यामामा यांना देण्यात आले,
यावेळी धर्मवीर ट्रस्ट चे अध्यक्ष किरन केणे, भिंवडी बाजार समितीचे उपसभापती मनिष म्हात्रे, डॉ संजीवन म्हात्रे, शाबाज कुंगळे, रघुनाथ वाळंज, दिनेश फिरंगाणे,कैलाश मगर, सुरेश जाधव तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,राया ओझर्लीचे शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.