टिटवाळा येथे जनसेवा कार्यालयाचे उदघाटन
भारतीय जनता पक्षाचे उधोग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांनी टिटवाळा परिसरातील नागरिकांकरिता जनसेवा कार्यालय सुरु केले आहे. हया कार्यालयातुन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अर्ज मोफत मध्ये भरून नागरिकांना लाभ मिळणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत जनसेवा कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विधान परिषद आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी,माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, वॉर्ड अध्यक्ष किरण रोठे,अमोल केदार, जयराम भोईर, गजानन मढवी, अमित धाक्रस,यांच्या सह आदी उपस्थित होते.
यावेळी परेश गुजरे यांनी सांगितले की आपण जनतेच्या सेवेसाठी जनसेवा कार्यालय सुरु केले आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना गोरगरिबां पर्यंत पोहचल्या पाहिजेत. तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, हेल्थ कार्ड, बँक पासबुक, विविध प्रकारचे शासकीय दाखले अर्ज मोफत भरण्यात येतील असे सांगितले.
यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान किरण गुजरे व परेश गुजरे यांनी केला.
तसेच जनसेवा कार्यालय उदघाटन समयी पाचशे नागरिकांना धान्य किट वाटप करण्यात आले.