इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील पळसनाथ मंदीराचा भीममहात्म्य पौराणिक ग्रंथात उल्लेख
इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील उजनी जलाशयातील पळसनाथ मंदीराचा व नहुष राजाचा भीममहात्म्य या पौराणिक ग्रंथात उल्लेख आढळतो अशी माहिती पळसदेव येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री.तानाजीराव गुलाबराव काळे यांनी दिली.
उजनी जलाशयातील पळसनाथाचे मंदीर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने हडपसरपासून १२० किलोमीटर अंतरावर असून भिगवणपासून थोड्या अंतरावर गेल्यावर उजनी जलाशयात पळसनाथाचे मंदीर दिसू लागते.
१९७८ साली उजनी धरणाचे काम पूर्ण झाल्यावर बरीच गावे पाण्याखाली गेली.
पळसनाथ मंदीरातील महादेवाचे शिवलिंग ,मुर्ती गावातील मंदिरात शिफ्ट, स्थलांतरित करण्यात आली.
श्री. पळसनाथाचे मंदीर ४३ - ४४ वर्षापासून पाण्याखाली आहे.मंदीराचे बांधकाम १०व्या, ११ व्या शतकातील , हजार वर्षापूर्वीचे असून मंदीर हेमाडपंथी आहे. डाव्या बाजूला हनुमानाची मुर्ती असून मंदीराचे बांधकाम काळ्या दगडी पाषाणातले आहे. देव देवतांच्या मुर्ती कोरलेल्या असून मंदीराचा कळस पूर्णपणे पोकळ आहे. कोरीव नक्षीकाम केलेले आहे.
मंदीराला चारही बाजूंनी तटबंदी होती. तटबंदी पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे.