• Total Visitor ( 134142 )

साहुर शाळेत नाविन्य पूर्ण उपक्रम

Raju tapal March 31, 2025 5

दादा भामोदकर विद्यालयात गणिताचे सहअध्यायी अध्यापन वर्ग

साहुर शाळेत नाविन्य पूर्ण उपक्रम

भातकुली दि.३१ - महाराष्ट्र राज्य सरकारने यावर्षी पासून शालेय अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे, यात यावर्षीपासून आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे लागू होणार असून यामध्ये सहअध्यायी अध्यापन याला फार महत्त्व देण्यात आलेले आहे, यात साहूर येथील दादा भामोदकर कृषि विद्यालयाने पुढाकार घेऊन वर्ग पाच ते नऊ (5 ते 9) पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबविला, यात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पायाभूत स्तरावरील एकूण वीस गणिते देण्यात आली, ज्या विद्यार्थ्यांनी ही सर्व वीस (20) गणिते पूर्ण सोडवली, त्या विद्यार्थ्यां मार्फत उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गटा गटात विभागणी करून मार्गदर्शन करण्यात आले, 
सहध्यायी अध्यापन म्हणजे आपल्याच वर्गातील सहकारी विध्यार्थ्या कडून त्याचं वर्गातील मागे असलेल्या विध्यार्थ्यांना समजत नसलेला विषय समजावून सांगने, सोप्या भाषेत सांगायचे असेल तर अध्ययनात जे विद्यार्थी मागे आहे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्याकडून करण्यात आलेली कृती म्हणजेच मदत होय. याचे महत्त्व अगण्य आहे, जसे की जे विद्यार्थी शिक्षकासोबत बोलू शकत नाही किंवा शिक्षकांसोबत बोलायला घाबरतात, ते आपल्या वर्गातील सहकार्यासोबत मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि स्वतःला ज्या विषयांमध्ये अडचण आहे ती आपल्या सहकाऱ्यासोबत बोलून दूर करू शकतात. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी दुसऱ्यांना मदत करतात ते स्वतः मधील लीडरशिपची क्षमता, सामाजिक क्षमता आणि भावनिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. 
यामुळे जय विद्यार्थी अध्ययनात मागे आहेत त्यांनी आम्हाला आणि सर्वांना हे सांगितले की आमचे मनोबल वाढले आहेत आणि यापुढे आम्ही आता अशाच प्रकारचा प्रयत्न करून आमच्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा करू. ज्या विद्यार्थ्यांनी अध्यापन केले त्यांच्यामध्ये वरील गुणांची क्षमता वाढली यावरून असे सिद्ध होते. हेच तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील सर्वात महत्त्वाचे उद्देश्य आहे. या कार्यक्रमात आपल्या सहकार्याना अध्यापनाचे (शिकवीन्याचे) काम अथर्व बोंडे, चैतन्य चव्हाण, अहर्त पाटील, सुमित चव्हाण, नमन टवलारे, ईशान जिसकार, आदित्य चव्हाण, पलक मोहोळ, 
समृद्धी मोहकर, आकांक्षा बिजवे, 
तन्वी ठवळी, श्रेया तंतरपाळे, स्वराज्य डहाके, श्रवण सोनवणे इत्यादी विध्यार्थ्यांनी आनंदाने केले. 
हा सर्व कार्यक्रम शाळेतील गणित शिक्षक  निलेश चाफलेकर सर यांच्या कल्पकतेतून संपन्न झाला. हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी सर्व गणित शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षक जसे बर्डे म्याडम, डाबेराव मॅडम, गंदे मॅडम, मोहड सर, देशमुख सर, ताले सर, काकडे मॅडम, गवई सर यांचे मोलाचे योगदान होते. 
या कार्यक्रमा करिता शाळेचे मुख्याध्यापक मा चिंचोळकर सर यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यामुळे हा कार्यक्रम परिपूर्ण होऊ शकला.
 

Share This

titwala-news

Advertisement