• Total Visitor ( 84433 )

जलालपूर मतदारसंघाची जबाबदारी मा.आ नरेंद्र पवारांच्या खांद्यावर

Raju Tapal September 17, 2022 32

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जलालपूर मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार नरेंद्र पवारांच्या खांद्यावर
जलालपूर मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्या बरोबर पवार चार दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्यावर गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे.  येत्या डिसेंबर अखेरपर्यंत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची शक्यता आहे, भाजपच्या महत्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या गुजरातमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच मिशनचा भाग म्हणून नरेंद्र पवार यांना गुजरात मधील नवसारी जिल्ह्यातील जलालपूर विधानसभेच्या प्रभारी पदी निवड केली आहे. निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रभारी मतदारसंघात जात नरेंद्र पवार यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा, आघाड्या आणि नेत्यांच्या भेटी व बैठकी घेत संघटनात्मक आढावा घेणे सुरू आहे. बूथ नियोजनापासून ते मतदानापर्यंत लहान लहान गोष्टींवर चर्चा करण्यात येत आहे. नरेंद्र पवार हे शांत संयमी आणि मितभाषी आहेत. कल्याण पश्चिमचा आमदार म्हणून अत्यंत चांगले काम केल्यानंतर भाजपाने त्यांना प्रदेश सचिव केलेले तसेच सध्या त्यांच्यावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश संयोजक पदाची मोठी जबाबदारी आहे. या अगोदर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पक्षाने प्रभारी म्हणून पाठवले होते, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चांगले काम केल्याने भाजपाने त्यांना पुन्हा एकदा "मिशन गुजरात"साठी पाठवले आहे.

Share This

titwala-news

Advertisement