जिल्हा परिषद नांदप शाळेत विदयार्थी प्रवेशोत्सव साजरा
Raju Tapal
December 20, 2021
97
जिल्हा परिषद नांदप शाळेत विदयार्थी प्रवेशोत्सव साजरा
कल्याण तालुक्यातील
गोवेली केंद्रामधील
जिल्हा परिषद शाळा नांदप शाळेने कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून 15 डिसेंम्बर रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आले. इ.१ली ते ४ थी चे वर्ग सुरू झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इ.१ली मध्ये दाखल झालेल्या नवागत मुलांना पुष्गुच्छ,फुगे, रंगीबिरंगी टोप्या देऊन स्वागत
प्रभारी मुख्याध्यापिका मंदा भगवान राऊत,दीपक बाळकृष्ण ईसामे,भारती लक्ष्मण आंबेकर व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिनेश नारायण शेलार, ज्योती जीवन शेलार,मीना हनुमान बोस्टे यांनी केले .
याप्रसंगी मुलांमध्ये वृक्षारोपणाची आवड व महत्त्व निर्माण व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन केले व प्रत्येकाला एक एक रोप कुंडीत लावण्यास देण्यात आली.
Share This