जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा 'उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी' म्हणून गौरव...
Raju Tapal
February 17, 2022
32
संपूर्ण कोकणविभागात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा' उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी' म्हणून गौरव,तर जिल्हाधिका-याकडून पत्रकारांचे कौतुक
भारत निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार जनजागृती अभियानात सन २०२१-२२ या वर्षामध्ये 'उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची निवड महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केली असून ही संपूर्ण कोकण विभागातून एकमेव निवड आहे,त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे तर पत्रकार संजय कांबळे यांचा ठाणे जिल्हा परिषदेकडून झालेल्या गौरवाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
२००९च्या आय एएसच्या बँचचे राजेश नार्वेकर हे अधिकारी असून त्यांनी या अगोदर रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबविली, तसेच त्यांच्या कार्यकाळात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला होता. तसेच त्यांनी२०१८मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून काम केले होते. अभ्यासू, मितभाषी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. अशा या अधिका-यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारताच कामाचा डोंगर उभा केला.
कोरोना सारख्या अंत्यत कठीण काळात कठोर उपाययोजना केल्या, यंत्रणा कामाला लावली, आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवल्या,रोज बैठका, अधिका-याशी सुसवांद,रुग्णालयाना भेटी, भिवंडी तालुक्यात सावज व कल्याण तालुक्यात वरप येथे कोविड सेंटर सुरू केली. त्यांच्या या काळातील कामाचे अनेकांनी कौतुक केलं होतं.
यानंतर ठाणे जिल्ह्यातील६महानगरपालिका,२अ वर्ग नगरपालिका,२नगरपंचायत, यांचा येणारा निवडणूक कार्यक्रम,या बरोबरच उल्हास नदीच्या वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जलपर्णी मुक्त नदी करण्यासाठी केलेले,बेटीतून प्रवास, अगदी आयर्न खान ड्रग्ज प्रकरणामुळे प्रसिद्धी मिळालेले एनसीबी मुंबई चे माझी झोनल ड्रायरेक्टर समिर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटचा परवाना रद्द करून दणका दिला. अगदी कोणतेहि काम जबाबदारी ने पार पाडले,
भारत निवडणूक आयोगाने१जानेवारी२०२२व या अगोदर दिनाकांवर आधारित छायाचित्रासह मतदार मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व मतदार जनजागृती अभियान राबविले, यामध्ये रेल्वे स्थानक, बस स्थानक, घंटागाडी, तीनचाकी गाडी,याव्दारे प्रसिद्धी तसेच स्वीप कार्यक्रमाचे विविध माध्यमातून संदेश, मालमत्ता कर,पाणीपट्टी देयके, आदी व्दारे व्यापक मोहीम राबविण्यात आली याचा परिणाम २०२२च्या मतदार यादीत जिल्ह्यात नव्याने नोंदणी झालेल्या मतदांराची संख्या१लाख७०हजार६९९ऐवढी झाली तर एकूण मतदारांची संख्या ६४लाख६६हजार७९८झाली यासारख्या अंत्यत चांगल्या कामाबद्दल ठाणे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांची संपूर्ण कोकणविभागातून२०२१-२२या काळात मतदार जनजागृती साठी'उत्कृष्ठ जिल्हा निवडणूक अधिकारी'म्हणून महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी यांनी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा एस के फिल्म हाऊसचे प्रमुख पत्रकार संजय कांबळे यांनी ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे अभिनंदन केले असता त्यांनी ही श्री कांबळे यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ श्रेयाताई गायकर, या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल,झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी त्यांच्या पत्रकारीतेबद्दल त्यांचा सत्कार केल्या चे समजल्याने श्री नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Share This