जीवनदीप च्या विद्यार्थ्यांनी घेतली क्रीडा क्षेत्रात उंच भरारी
Raju Tapal
October 08, 2022
38
जीवनदीप च्या विद्यार्थ्यांनी घेतली क्रीडा क्षेत्रात उंच भरारी
जीवनदीप महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच आपल्या यशाने उंच भरारी घेतांना दिसतात.. ह्यावेळेस ही जीवनदीप च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे...
विले पार्ले येथील एम.एल. डहाणूकर कॉलेज , मुंबई येथे झालेल्या इंटर झोन शूटिंग स्पर्धेत ठाणे झोन ला तिसरे प्लेस मिळाले. यात महाविद्यालयाची विद्यार्थिनी तेजस्विनी चौधरी ही देखील सहभागी झाली होती.. त्यामुळे तेजस्विनी हिने महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे..
तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठ अंतर्गत विभागीय ज्युडो स्पर्धा मुंबई क्रिडा संकुल दि.6 ऑक्टोबर रोजी झाली.. ही स्पर्धा मरीन लाइन्स येथे पार पडली यात महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार सिद्धांत कदम याने कास्य पदक पटकावले आहे .. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,प्राचार्य डॉ.कोरे,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,क्रीडा शिक्षक प्रा. मोहनिश देशमुख, यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Share This