• Total Visitor ( 133640 )

जो बूथ जिंकेल तो निवडणूक जिंकेल- माजी आमदार नरेंद्र पवार

Raju Tapal November 29, 2021 57

जो बूथ जिंकेल तो निवडणूक जिंकेल- माजी आमदार नरेंद्र पवार 

नरेंद्र पवार यांच्या दौऱ्याने विदर्भात भटके विमुक्त आघाडीचे संघटन मजबूत

 भाजपा मध्ये बूथ रचनेला अतिशय महत्व असून जो बूथ जिंकेल तोच निवडणूक जिंकेल त्यासाठी भाजपाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे,नागपूर महानगर जिल्हा अध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर आदींची भेट घेतली. 
काल वाशीम येथे बंजारा समाजाचे आराध्या दैवत असलेल्या पोहरादेवी येथील जगदंबा देवी मंदिर व भगवान श्री.सेवालाल महाराज यांचे दर्शन घेवून मंदिराची व अन्नदान छत्र यांची पाहणी केली. याप्रसंगी महंत श्री.कबीर महाराज यांचेकडून शाल व श्रीफळ देवून स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच केली व महान संत  रामराव महाराज यांचे समाधी स्थळावर हार अर्पण करून आदरांजली वाहिली. सोबत उपस्थित सर्व मान्यवरांनी भक्तीधाम येथे दर्शन घेतले या ठिकाणी सर्व मान्यवाराचे महंत श्री.जितेन्द्र महाराज यांनी मनीचे हार देवुन स्वागत व सत्कार केले. या धावत्या दौऱ्या दरम्यान दीग्रस जी - यवतमाळ  येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.विवेक बनगीनवार व तालुका अध्यक्ष श्री.रवि अरगडे यांचेकडून स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अरविंद गजबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य योगेश बन,भटके विमुक्त आघाडी महिला विदर्भ संयोजिका डॉ. जयश्रीताई गुट्टे, भटके विमुक्त आघाडी युवा सहसंयोजक श्री.अशोक शेळके,भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष डॉ.रोहित माडेवार, भटके विमुक्त आघाडी महामंत्री पांडुरंग शेगर,ठाणे ग्रामीण जिल्हा संयोजक श्री.सतीश गिरी, भटके विमुक्त आघाडी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री.मोहन जाधव तसेच श्री.सुभाष राठोड व सौ.छाया राठोड, रुपेश जाधव आदि. मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तर नागपुर ग्रामीण मधील खेतापुर गावातील गोपाल समाज वस्ती मध्ये नरेंद्र पवार यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले.
यावेळी सोबत भटके विमुक्त आघाडी महिला विदर्भ संयोजिका डॉ.जयश्री ताई गुट्टे, अशोक शेळके,डॉ रोहित,सतिश गिरी डॉ. पंकज लोहि,पांडुरंग सेगर  महामंत्री नागपुर ग्रामीण भटके विमुक्त आघाडी,वसंता बंदरे आदिवासी आघाडी, तूषार ढोले युवा मोर्चा सरचिटणीस नागपुर ग्रामीण आदी उपस्थित होते. नागपूर ग्रामीण येथे गट ग्रामपंचायत चांपा चे सरपंच श्री.आतिश पवार व उपसरपंच  अर्चना शिरसमा यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व पदाधिकारी यांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. यावेळी भटके विमुक्त आघाडी महिला विदर्भ संयोजिका डॉ.जयश्रीताई गुट्टे, भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष डॉ.रोहित माडेवार, नागपूर महानगर महामंत्री श्री.विनोद धाडे भटके विमुक्त आघाडी, डॉ.पंकज लोही, पांडुरंग सेगर, वसंता बंदरे, तुषार ढोले आदि. मान्यवर पदाधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. 
शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा अध्यक्षांच्या भेटी घेऊन बूथ स्तरापर्यंत भटके विमुक्तांचे संघटन वाढविण्यासाठी चर्चा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

Share This

titwala-news

Advertisement