पत्रकार कार्यशाळेचे मंचर येथे आयोजन
शिरूर :- आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी पत्रकारांच्या 'एकदिवसीय कार्यशाळे'चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून आंबेगाव, खेड,जुन्नर तसेच शिरूर तालुक्यातील पत्रकारांनी कार्यशाळेस उपस्थित राहाण्याचे आवाहन आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष निलेश कान्नव यांनी केले आहे.
माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या "पत्रकार कार्यशाळे"स पहिल्या सत्रात दैनिक "सकाळ"चे मुख्य संपादक निलेश खरे, "टीव्ही 9 मराठी"चे संपादक उमेश कुमावत ,"लोकमत"चे संपादक संजय आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रांत गोविंदराव शहा, "मराठी पत्रकार परिषदे"चे विश्वस्त शरदराव पाबळे, पत्रकार डी.के.वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
दैनिक "सकाळ"चे संपादक सम्राट फडणीस दुस-या समारोप सत्रात दुपारी २ वाजता मार्गदर्शन करणार असून "म्हाडा"चे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली , जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष अॅड.स्वप्नील ढमढेरे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केलेले अधिकारी,मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
पत्रकारांनी कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे सचिव चंद्रकांत घोडेकर, सहसचिव विवेक शिंदे यांनी केले आहे.
प्रतिनिधी:- पत्रकार विजय ढमढेरे कोंढापुरी ( शिरूर)