के टी वेअर बंधा-यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू ; खेड तालुक्यातील साबुर्डी येथील घटना
के टी वेअर बंधा-यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील साबुर्डी येथे घडली.
किसन भिकाजी गोपाळे रा.साबुर्डी ता.खेड असे पाय घसरून मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव असून शनिवार दि.23/10/2021 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
किसन गोपाळे हे साबुर्डी येथील के टी वेअर बंधा-यावरून रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. अंधार असल्याने अंदाज न आल्याने बंधा-यावरून तोल जावून पाय घसरून जेष्ठ नागरिक किसन गोपाळेओढ्यातील दगडावर पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने गोपाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
गोपाळे यांचा भाचा राजेंद्र लक्ष्मण शिंदे रा.कोहिडे ता.खेड यांनी या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस हवालदार शेखर भोईर या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.