• Total Visitor ( 84197 )

कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थिती कार्यकर्त्यांना पद वाटप

Raju Tapal December 07, 2021 46

कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थिती कार्यकर्त्यांना पद वाटप...

घारिवली उसरघर संदप काटई गावातील कार्यकर्त्यांना पद वाटप... 


शिवसेना कल्याण ग्रामीण भागाचे खंबीर नेतृत्व कल्याण तालुका  संघटक अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सच्चा शिवसेना कार्यकर्त्यांना पद वाटप करण्यात आले.
श्याम पाटील यांना काटई गावचे शाखाप्रमुख, विजय पाटील उपशाखाप्रमुख, काशिनाथ बापू पाटील यांना उसरघर विभाग प्रमुख. संदप जितेंद्र दामोदर पाटील गटप्रमुख संपूर्ण ग्रामीण भागात पाणी वाटप करण्यात आले

कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर 
केली सच्चा कार्यकर्त्यांना पदभार देऊन सन्मानित केले आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली 
 
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कल्याण जिल्हाप्रमुख  ,गोपाळ लांडगे , कल्याण ग्रामीण तालुका शाप्रमुख प्रकाश म्हात्रे, विभाग प्रमुख बंडू पाटील,हनुमान ठोंबरे खोणी गावचे माजी सरपंच,  ,एकनाथ पाटील विधानसभा संघटक, भरत कृष्णा भोईर उपजिल्हाप्रमुख, गणेश जेपाल 14 गाव विभाग प्रमुख. सोनू संते
 कोळेगाव विभाग प्रमुख. महिला विभाग सुषमा ढोले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्याण तालुका गोपाळ लांडगे म्हणाले की पदाला न्याय मिळाल असेच वागा पक्ष मोठा असतो पक्षामुळे आपण मोठे होतो त्यामुळे मानसन्मान मिळतो तळागाळातल्या समाजापर्यंत कार्य करत राहा या ग्रामीण विभागात जुने कार्यकर्ते परत आले आणि नवीन कार्यकर्ते पक्षात सामील झाले त्यामुळे हा विभाग भगवामय झालेला आहे.

Share This

titwala-news

Advertisement