कल्याणमध्ये मोदीजींच्या जी20 च्या अध्यक्ष पदाबद्दल रांगोळी काढून अभिनंदन
Raju Tapal
January 16, 2023
41
कल्याणमध्ये मोदीजींच्या जी20 च्या अध्यक्ष पदाबद्दल रांगोळी काढून अभिनंदन
■ जागतिक स्तरावर भारताचा सन्मान झाल्याबद्दल भाजपा महिला मोर्चाचे आयोजन.
जगामध्ये पहिल्यांदाच जी20 चे अध्यक्षपद भारताकडे आले असून या जी20 च्या अध्यक्षस्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान होणार आहेत, जागतिक स्तरावर आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असल्याने भारतभर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन व कौतूक करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय महिला मोर्चाच्या वतीने देशभर जी20 रांगोळीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आवाहनानुसार कल्याण पश्चिम येथे कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेरील परिसरात जी20 ची भव्य रांगोळी साकारली होती.
जी 20 च्या निमित्ताने भारताची मान जागतिक स्तरावर उंचावली असून, त्याचे अध्यक्षपद इतिहासात पहिल्यांदाच भारताकडे आले आहे. अनेक देश यामध्ये सहभागी होत असून जागतिक आर्थिक बाबींवर चर्चा होणार आहे, हा युरोपियन युनियन आणि 19 देशांचा अनौपचारिक गट आहे. / हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. त्याचे नेते दरवर्षी G20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा करतात हे यावर्षी भारतात होत असल्याचा आनंद आहे असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्र्विद्यालय कल्याणच्या मा.अलका दिदी, कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्षा हेमलता पवार, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर महिला मोर्चा अध्यक्षा ज्योतीताई भोईर, महेश केळकर, एस एम. जोशी, मयुरेश आगलावे,समृध्दी देशपांडे, भावना मनराजा, स्नेहल सोपरकर, नम्रता चव्हान, निलांबरी देव, निताताई देसले, सविता गुप्ता, मकरंद ताम्हणे, हिरा आवारी, निशिगंधा पवार, रश्मी पवार, कविता वर्मा, माया दळवी आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Share This