कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी रेशमा भोईर याची बिनविरोध निवड
Raju Tapal
April 03, 2022
150
कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी रेशमा भोईर याची बिनविरोध निवड
कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी रेशमा मुकेश भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अत्यंत आनंदमय आणी खेळीमेळीच् वातावरणात निवडणूक पार पडली असुन भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्रितपणे येऊन सभापती पदाची निवडणूक बिनविरोध केली आहे.
कल्याण पंचायत समिती मध्ये एकूण सध्या अकरा सदस्य आहेत. यामध्ये अनिता वाघचौरे,भरत भोईर, दर्शना जाधव, पांडुरंग म्हात्रे,रेशमा भोईर, अस्मिता जाधव, भरत गोंधळे,रमेश बांगर, यशवंत दळवी, रंजना देशमुख इत्यादी अकरा सदस्य राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना पक्षाचे आहेत.
तत्कालीन सभापती अनिता वाघचौरे यांनी आप आपसात ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्या प्रमाणे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या कडून 30 मार्च रोजी सभापती निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी रेशमा भोईर यांनी अर्ज निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे दाखल केला यावेळी नायब तहसिलदार संजय भालेराव व सुनील कोलते यांनी निवडणूक कामाला सहकार्य केले.
रेशमा भोईर याचा एकमेव अर्ज सभापती पदासाठी दाखल झाला होता, त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी सभापती रेश्मा भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित सदस्य व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सभापती रेशमा भोईर यांना शुभेच्छा दिल्या.
रेशमा भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे,पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष चंदू बोस्टे, रवींद्र टेंबे, भाजपचे ठाणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष जयराम भोईर, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा मगर, योगेश धुमाळ,राजाराम चौधरी सर, चिंतामण मगर,अनंता डोर्लेकर, जगन्नाथ शेळके,अरविंद शेलार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभापती रेश्मा भोईर यांनी सांगितले की राष्ट्रवादी, शिवसेना,भाजप मधील सर्व सदस्य यांनी मला सहकार्य केले व माझी बिनविरोध सभापती पदी निवड केली आहे. या सर्वाना सोबत घेऊन पंचायत समिती मधील विकास कामे करणार आहोत.
Share This