कल्याण पूर्वेतुन भाजपच्या सुलभा गायकवाड यांना उमेदवारी.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असुन कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कल्याण पूर्वेतील तिसाई येथील जनसंपर्क कार्यलयात भाजपच्या कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला, पेढे भरवुन आनंद व्यक्त केला,फटाके वाजवले,उमेदवार सुलभा गायकवाड यांनी तिसाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी,माजी नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, भाजप महिला जिल्हा अधयक्षा रेखा चौधरी यांच्या सह भाजप पदधिकारी उपस्थित होते.