काँग्रेस कार्यकर्त्यांचा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरावर धडक मोर्चा...
मात्र पोलिसांनी रांजणोली नाक्यावरच अडवले
महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला या विधाना वरून
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल 13 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा देऊन मंत्री पाटील यांच्यावर घराकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड पोलिसांच्या ताफ्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना रांजनोली नाका येथे अडवले, यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांमध्ये हुज्जत झाली, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठक मांडून निषेध केला, जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी
सुभाष कानडे प्रदेश उपाध्यक्ष, सुरेश टावरे माजी खासदार, रशीद तहीर भिवंडी शहर अध्यक्ष, निलेश पेंढारी जिल्हा सहप्रभारी, महेश धानके शहापूर तालुका अध्यक्ष, चेतन पवार मुरबाड अध्यक्ष, संजय जाधव बदलापूर अध्यक्ष, सोमनाथ मिरकुटे कल्याण ग्रामीण अध्यक्ष, राकेश पाटील भिवंडी ग्रामीण अध्यक्ष, रवींद्र परटोले जिल्हा मुख्य नोंदणीकर्ता, प्रकाश भांगरथ सेवादल अध्यक्ष, श्री. देवेंद्र भेरे सरचिटनिसं ठाणे ग्रा. काँग्रेस तसेच भिवंडी शहर व ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.