काँग्रेसतर्फे राज्यपाल कोशारींच्या निषेधार्थ शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोशारीच्या वक्तव्याचा निषेध तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आला. औंरगाबाद येथे झालेल्या पदवीदान समारंभात भगतसिंग कोशारी यांनी जुन्याकाळात छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श असतील परंतु आत्ताच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना नितीन गडकरी यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा दयावा लागला होता अश्या भष्ट्राचारी व्यक्ती बरोबर तुलना केल्यामुळे निषेध केल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.
यावेळी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक वाघचौडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, तालुका सचिव भगवान तारमळे, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, नेताजी लाटे, विलास जाधव, वसंत कराळे, दिनेश जाधव, साईनाथ कंटे, प्रकाश पवार, स्वप्निल जाधव आदीं पदाधिकारी उपस्थितीत होते. धरणे झाल्यानंतर महामहीम आदरणीय राष्ट्रपती महोद्यांना मुरबाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देवुन राज्यपाल कोशारी यांची हकालपट्टी करुन पुरोगामी महाराष्ट्र योग्य व्यक्तीची निवड करावी अशी मागणी निवेदनात केली.