कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण शीळ रस्त्यावरील १४८ अनाधिकृत टप-या,हातगाडया, बाकडे व शेड्सवर निष्कासनाची धडक कारवाई !
महापालिका क्षेत्रातील कल्याण शीळ रस्त्यावरील अतिक्रमणे/टपऱ्या/शेड्स/गॅरजेस/भंगार दुकाने निष्कासित करणेकामी "विशेष मोहिम" राबविणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड येथील देशमुख होम्स, टाटा पॉवर, दावडी, सोनारपाडा, काटई पलावा पर्यंत रस्त्यावरील व रस्त्याच्या दुतर्फा पदपथावरील १५ टपऱ्या, ८ हातगाड्या, ५ बाकडे व १२० शेड्स अशा एकूण १४८ अनधिकृत अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.
सदर कारवाई '६/फ','८/ग','९/आय' व '१०/ई' प्रभागाचे सहा.आयुक्त भरत पाटील, संजय साबळे, हेमा मुंबरकर व भारत पवार यांनी संयुक्त पणे तसेच महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने केली. सदर कारवाई यापुढेही सुरू रहाणार आहे.