मांडा पश्चिमेतील 90 फिट रोडवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम केडीएमसीने केले भुईसपाट
मांडा पश्चिमेतील 90 फिट रोडवर एक अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकाला कर वसुली करताना आढळून आले. संबंधित सुरू असलेल्या बांधकामांवर लागलीच निष्कष्णाची कारवाई पाटील यांनी केली. केडीएमसीच्या आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी 31 मार्च पर्यंत कर वसुलीचे उद्देश सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले असताना अधिकारी वर्ग सदरील कामात व्यस्त असताना त्याचा फायदा अनधिकृत बांधकाम विकासक घेत आहेत असे बांधकामे शोधून 1 एप्रिल पासून पुन्हा जोरदार कारवाई लावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.