• Total Visitor ( 134344 )

कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोजमाप शिबीराचे आयोजन

Raju Tapal February 07, 2023 87

कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोजमाप शिबीराचे आयोजन 

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गरजा असणा-या अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायु व सांध्यांतर्गत तीव्र दोष असल्याने अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मापानुसार साहित्य तयार करुन दिल्यास त्यांच्या शरीराची स्थिती टिकवून ठेवण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ फिजिकल मेडीसिन ॲन्ड रिहॅबिलिटेशन, महालक्ष्मी मुंबई यांच्यामार्फत दि. ०७/०२/२०२३ रोजी मोजमाप तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराचा लाभ एकूण ६२ विद्यार्थ्यांनी घेतला आणि तपासणीअंती मार्च २०२३ अखेर विद्यार्थ्यांना कॅलिपर, स्पिलींट, मॉडिफाय चेअर, कॉर्नर सिटींग, वॉकर, कृत्रिम अवयव क्रचेस, सेलेटर इ. साहित्य देण्यात येईल.

सदर मोजमाप तपासणी शिबीराचे उद्घाटन प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी केले. यासमयी डॉ. संगिता गणवीर, समावेशित तज्ञ प्रांजल जाधव, वंदना पिंगाने, निलिमा खुंटले, बंदु घोडे,बुरुंगले, अनिता पाटील यांनी मेहनत घेतली

मिलिंद चंद्रकांत अहिरे आय.ई. समन्वयक यांनी शिबीर पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Share This

titwala-news

Advertisement