कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ६/फ प्रभागातील आरक्षित भूखंडावरील चाळीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार ६/फ प्रभागाचे सहा.आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व खंबाळपाडा, कांचनगाव येथील महापालिका आरक्षित भूखंडावर सुरु असलेल्या चाळीच्या (५ खोल्या) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज केली.
सदर कारवाई अनधिकृतबांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक जयवंत चौधरी व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी. व ७ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.