कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मास्क न घालणा-या व्यक्तींवर सक्त दंडात्मक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश !
Raju tapal
August 10, 2017
88
कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना कोविड नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.असे असतांनाही सदयस्थितीत अनेक नागरिक मास्क परिधान न करता सार्वजनिक ठिकाणी फिरतांना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासकीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आजच्या आढावा बैठकीत सर्व प्रभागातील सहा.आयुक्तांना दिले आहेत.
सहा आयुक्तांनी आपा-पल्या प्रभागात समक्ष पाहणी करुन पोलिस पथकाच्या मदतीने मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर यापुढे कारवाई सुरू ठेवावी,आशा सुचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
त्याच प्रमाणे अनेक दुकानदार फुटपाथवर दुकानाचे सामान किंवा नावाचे बोर्ड ठेवतात अशा दुकानांना दंड करणे, नागरिकांना फुटपाथवरुन मोकळे पणाने चालता यावे याकरिता फुटपाथवरील अतिक्रमणे हठविणे,अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मोहीम तीव्र पणे राबिवणेबाबत तसेच गार्बेज व्हर्नलेबल पॉईंट्स कमी करणे याबाबत संबधित उपायुक्तांना त्यांनी सूचना दिल्या.
विकास आराखडयानुसार असलेल्या एकुण-१२१२ आरक्षणांपैकी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या-५१३ आरक्षणांची पाहणी करुन त्यावरील अतिक्रमणे दूर करावीत तसेच सदर आरक्षित भूखंडांवर एनजीओच्या मदतीने वृक्ष लागवड करावी,असेही निर्देश पालिका आयुक्तांनी या बैठकीत दिले.
महापालिका क्षेत्रातील चाळी व तत्सम परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात या नागरिकांच्या सोयीसाठी सर्व सार्वजनिक शौचालये प्राधान्याने दुरुस्त करावीत,अशाही सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिल्या.
Share This