• Total Visitor ( 133239 )

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच !

Raju Tapal January 19, 2023 88

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच !
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९/आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व चिंचपाडा गाव येथील अनधिकृत चाळीमधील २ रुम आणि १४ जोत्यांच्या  (Foundation) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.
तसेच  गोळवली, विको नाका येथे  सुरू असलेल्या  तळ + १ मजली अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Share This

titwala-news

Advertisement