केडीएमसीत दोन डोस सक्तीचेच....!
Raju Tapal
December 23, 2021
33
केडीएमसीत दोन डोस सक्तीचेच....!
सुरक्षा रक्षकांकडून कडक तपासणी
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी व आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार महापालिकेत प्रवेश करतांना दोन कोरोना डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असने अनिवार्य आहे अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही याकरिता सुरक्षा रक्षकांकडून कडक तपासणी प्रवेश द्वारावर केली जात आहे. ज्यांनी दोन कोराना डोस घेतले आहेत, त्यानाच प्रवेश दिला जातो.
दोन वर्ष झाले कोरोना आजाराने थैमान घातले होते, देशात, राज्यात तसेच महापालिका क्षेत्रात हजारो नागरिकांना कोरोना आजार झाले होते, तर काहींना जीव हि गमवावा लागलेला आहे, शासनाकडून कोरोना आजारावर लस उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे आजाराचे प्रमाण कमी होत चालले आहे, प्रत्येक नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे, महापालिका क्षेत्रात पहिला डोस घेणारे 72 टक्के व दुसरा डोस घेणार 52 टक्के ईतकी टक्केवारी आहे.
तसेच ओमायक्राँन हया नवीन आजाराने डोके हळूहळू वर काढले आहे, तर महापालिका क्षेत्रात हि ओमायक्राँन रुग्ण आढळला होता, महापालिका प्रशासनाने कडक कारवाईस सुरुवात केली आहे, अधिकारी, कर्मचारी व नागरिक महापालिका मध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षक यांच्या कडून कडक तपासणी केली जाते,दोन डोस घेतले आसतील तरच प्रवेश दिला जातो, अन्यथा प्रवेश नाकारला जात आहे.
Share This