मतदानाचा दिवा तेवत ठेवा
Raju tapal
November 06, 2024
37
मतदानाचा दिवा तेवत ठेवा
अंबादेवी परीसरात मतदान जनजागृती
मनपा व जिल्हा स्वीप कक्षाचा उपक्रम
अमरावती दि.६-स्वीप कक्ष मनपा व स्वीप कक्ष जि.प.यांच्या संयुक्त विद्यमाने अंबादेवी परीसरात मंगळवारला सायंकाळी मतदान जनजागृती कार्यक्रमातंर्गत मतदानाचा दावा तेवत ठेवा असा संदेश देत दिवे लावून आणि मतदानाची शपथ देऊन करण्यात आली.यावेळी शेकडो नागरीक भक्त उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वञीक निवडणूक येत्या २०नोव्हेंबरला होत आहे.मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे.याकरीता स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.विविध परीसरात आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.याचाच एक भाग म्हणुन नागरीकांच्या गर्दीच्या ठीकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे या उपक्रमाला मतदारांचा चांगला प्रतिसाध मिळत आहे.
या उपक्रमाची सुरुवात अंबादेवी संस्थानचे विशस्त विलासदादा मराठे,मनपा शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डाॅ.प्रकाश मेश्राम,अॅड.पांडे, ज्ञानेश्वर राव घाटे, हेमंतकुमार यावले, प्रवीण ठाकरे, योगेश पखाले, पंकज सपकाळ,योगेश राणे, संजय बेलसरे, गणेश सावंत,उज्वल जाधव,सुमेश वानखडे, माहुलकर दादा,सरोदे भाऊ,राजेश सावरकर,आदित्य तायडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.तसेच
जिल्हा स्टेडियम, गांधी चौक, विलास नगर परीसरात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
शहरातील विविध खेळाची मैदाने, चौक अशा ठिकाणी नवीन तरुण मतदार यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याकरिता करून मतदारांना एकत्र आणून स्वीप नोडल अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र,मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप विभागाच्या वतीने मतदानाची शपथ दिली जात आहे. तसेच मतदान करणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती देऊन मतदानाचे महत्त्व या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.
Share This