महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वडकी ता.हवेली येथे दिनांक १२/०५/२०२२ रोजी खरीप हंगाम पूर्व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्र व प्रशिक्षण वर्गात कृषी सहाय्यक पुष्पा जाधव यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक बाजरी पीक प्रात्यक्षिक, प्रकल्प, मग्रा रोहयो फळबाग लागवड ,गांडूळखत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प, व विहीर पुनर्भरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतक-यांना केले.
कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळूंजकर यांनी जमिनीचे आरोग्य , जमीन सुपीकता, सेंद्रीय कर्ब, जिवाणू संवर्धन, सेंद्रिय खतांचा अवलंब, पिकांची फेरपालट, जमिनीतील घटक व पिक उत्पादनातील महत्व ,विषमुक्त अन्नधान्य,फळे व भाजीपाला उत्पादन, किटकनाशकांचा नियंत्रित वापर, लेबलवलेम निविष्ठांचा वापर एकात्मिक किड रोग नियंत्रण सापळा पिके, चिकट सापळे, फेरोमेन सापळे, जैविक निविष्ठांचा वापर जिवाणू संवर्धक खतांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण व उपाययोजना ,हुमणी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा अवलंब करण्याचे आवाहन उपस्थित शेतक-यांना केले.
हडपसर येथील मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांनीही या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
सरपंच अरूण गायकवाड यांचेही यावेळी भाषण झाले.
प्रशिक्षण वर्गास महेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सागर मोडक, मच्छिंद्र गायकवाड, श्रीमती ज्योती हिरवे, मुक्ता गर्जे, कृषी सहाय्यक दिगंबर जाधव, कृषी मित्र अभिजित मोडक ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, हवेली तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.