पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ट्रकने पुढे चाललेल्या तीन कारला ठोकरल्याने झालेल्या अपघातात १ ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले..
हा अपघात सोमवारी दि.८ नोव्हेंबर ला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील एस वळणावर झाला. अपघातातील मृताचे तसेच जखमींची नावे समजली नाहीत.
खंबाटकी बोगदा उतरल्यानंतर तीव्र उतारावरील एस आकाराच्या वळणावर ताबा सुटल्याने के ए २७ ए ९०१९ या क्रमांकाच्या ट्रकने पुढे सयोर चाललेल्या एम एच १२ एस वाय ४३२४, एम एच १४ एच के ४२४३ एम एच १२ एस एल ७६६७ या तीन कारला उडविल्याने वाहनांचे मोठे नुकसान होवून अपघातात एक जण ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या याच घाटातील बोगद्यात सकाळी सात कार एकमेकांना धडकून अपघात झाल्याचेही समजते.