• Total Visitor ( 84602 )

खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न

Raju Tapal April 30, 2022 39

महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी हवेली,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा)पुणे व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे फुरसुंगी येथील भेलुसे वस्ती येथे खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण  वर्ग दिनांक २६/४/२०२२ रोजी संपन्न झाला.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे .सुनिल खैरनार व तालुका कृषि अधिकारी, मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्गात बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक, बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक, प्रधानमंत्री पिक विमा योजना, गुलाब शेती समस्या व उपाययोजना, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, शेतकरी उत्पादक कंपनी , वेस्ट डिकंपोजर कल्चर वापर,कृषि यांत्रीकीकरण, ठिबक सिंचन/ तुषार सिंचन बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार गुलाब शेती व गुलाब पिक उत्पादन मधील समस्या व उपाययोजना बाबत मार्गदर्शन करताना  केंद्रीय पुष्पोत्पादन केंद्र,मुंढवा , पुणे येथील पुष्प तज्ञ डाॅ .गणेश कदम यांनी गुलाब पिकाची लागवड,खत व्यवस्थापन, गुलाब पिकांवरील विविध किड रोग नियंत्रण व उपाययोजना , गुलाब प्रक्रिया व उपपदार्थ निर्मिती,ब्रॅंडीग, मार्केटींग बाबत माहिती दिली व गुलाब पिकास क्षेत्रिय भेट देऊन किडींची व रोगांची ओळख शेतकऱ्यांना करुन दिली व उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.तसेच  गुलाब पिकांच्या  सुधारित वाणांची व कामिनी पिकाची लागवड,निर्यात संबंधीत माहीती देऊन शेतकऱ्यांनी पुष्पोत्पान केंद्रास भेटी देऊन तेथील आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करुन त्याची अंमलबजावणी आपल्या शेतावर करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
     कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील डाॅ.यशवंत जगदाळे ,
 महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,पुणे प्रमुख व भुदरगड शेतकरी उत्पादक कंपनी चे बाळासाहेब सोळुंकुरे पाटील ,
.गुलाबराव कडलग, मंडळ कृषि अधिकारी हडपसर ,
,एचडीएफसी अर्गो कंपनीचे प्रतिनिधी मदने ,
मेघराज वाळुंजकर,कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ ,.रामदास डावखर कृषी पर्यवेक्षक हडपसर - २,पुष्पा जाधव, ज्योती हिरवे,  गौरव कुंजीर, सामाजिक कार्यकर्त्या  भाग्यरेखा जोग, सहाय्यक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा  रेश्मा शिंदे, यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
मौजे वडकी व मौजे फुरसुंगी येथील शेतकऱ्यांना वेस्ट डिकंपोजर कल्चर चे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष  जगन्नाथ कामठे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना करण्यात आले.
सदर प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक  गुलाबराव कडलग , मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांनी केले, सुत्रसंचलन मेघराज वाळुंजकर यांनी केले व प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन  ज्योती हिरवे यांनी केले.
प्रगतशील शेतकरी संतोष हरपळे यांनी सदर प्रशिक्षण वर्गातील सर्व मान्यवरांचे स्वागत करून  आभार मानले. व उपस्थित शेतकऱ्यांना गुलाब शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमास आबा सायकर माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रगतशील शेतकरी बापुसाहेब भेलुसे,मच्छिंद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य वडकी, सचिन झांबरे , कृषि सहाय्यक राजेन्द्र भोसेकर,नागेश म्हेत्रे,गुलाब पिक उत्पादक संतोष हरपळे,आप्पा हरपळे, श्गुलाब हरपळे .सतीश पवार, बाळासाहेब पवार, सतीष हरपळे ,महेश हरपळे, रामदास हरपळे, बाबुराव भाडळे,.संपत हरपळे, दिगंबर हरपळे, अतुल हरपळे, राणु झेंडे,सचिन हरपळे,उद्धव चंद,वाजे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement