खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त टिटवाळा महागणपती मंदिरात अभिषेक.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी मांडा टिटवाळा शहर कडून टिटवाळा येथील महागणपती मंदिर येथे अभिषेक करण्यात आला. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना गणरायाला करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 10 चे अध्यक्ष मोरेश्वर तरे, प्रभाग क्रमांक 9 चे अध्यक्ष दिपक कांबळे, प्रभाग क्रमांक 8 चे अध्यक्ष महेश भोय, जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळण, सुनील भोईर, संदीप श्रीकांत तरे, मनिष मारके,भरत थापा, प्रशांत भांगरे, सिध्देश परब,प्रतिक थोरात, गुलाब मदारी, महादेव पाटील, धनाजी जाधव, दिनेश वारघडे, रुपेश कदम, बाळकृष्ण लिंगायत, महेश घडशी यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे टिटवाळा प्रभाग अध्यक्ष मोरेश्वर तरे यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला. शरद पवार यांना दिर्घ आयुष्य लाभो असे साकडे महागणपती घातले, तसेच आपण सामाजिक उपक्रम गेल्या अठरा वर्षापासून राबवित आहेत. खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम मध्ये फळे व अन्न दान वाटप करीत असतो, परंतु कोरोना आजाराचे सावट तसेच शासनाचे नियम पाळून फळे व अन्न दान कायर्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे तरे यांनी सांगितले.